तरुण दिसण्यासाठी 10 योगासने करावी. ते कोणते पुढील प्रमाणे पाहू या.10 yoga poses to look younger.

१) शवासन Shavasana
प्रथम पाठीवर झोपावे. पायामध्ये थोडेसे अंतर ठेवावे .हात सरळ आणि शरीरापासून सहा इंच अंतरावर ठेवावे. तळहात वरच्या दिशेला ठेवावे. बोटे अर्धवट मिटलेली असू द्यावी. डोळे मिटावे. आता मन एकाग्र करून शरीराचा एकेक भाग शिथिल करण्यास प्रयत्न करावा. पाय ,पोटऱ्या, गुडघे, मांड्या, नितंब ,पोट ,हात ,पाठ,छाती ,खांदे ,मान ,चेहरा, डोके असा एकेक अवयव शिथील करावा. अगदी आरामात एखाद्या प्रेतासारखे पडून राहावे. आता सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करावे. यामुळे संपूर्ण शरीर शिथिल होते. कोणत्याही हालचाल न करता सर्व चिंता विसरून दहा ते पंधरा मिनिट अशा तऱ्हेने पडून राहावे .पायांना मुंग्या आल्या तर आसन मोडून नंतर पुन्हा जमवावे. शविसनामुळे मनाला आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. योगाच्या सुरुवातीला आणि शेवटी शवासन करावे.
२)योगमुद्रा yoga posture
पदासन घालून ताट बसावे. दोन्ही हात मागे नेऊन एका हाताने दुसऱ्या हाताचे मनगट पकडावे. लांब श्वास घ्यावा .श्वास सोडताना हात मागेच ठेवून सावकाशपणे समोर वाकावे. नाक आणि कपाळ जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करावा .श्वास घेताना सावकाशपणे वर या .या आसनामुळे मज्जासंस्था कार्यक्षम होते. पोटांचे स्नायू आणि ओटीपोटातील अवयव बळकट होतात. पचन सुधारते भूक लागते आणि बुद्धकोष्ट दूर होतो.
३)वज्रासन Vajrasana
ताट बसून पाय सरळ करावे. पाय गुडघ्यांमध्ये वाकूवून पायाच्या टाचा नितंबाजवळ ठेवाव्या .तळवे मागे आणि वरच्या दिशेला असून द्यावे .आता नितंब उचलून दोन्ही टाचांवर ठेवावे .पायाचे अंगठे जवळजवळ आणावे .दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवावे. पाठ आणि मान ताठ ठेवावी. हे आसन जेवल्यानंतर केले तर चालते. त्यामुळे पचन सुधारते आखडलेल्या पायांना आराम मिळतो . नितंब ,मांड्या, गुडघे, पोटऱ्या,घोटे आणि पायांची बोटे यांना बळ मिळते.
४)सर्वांगासन Sarvangasana
या आसनात शरीराचे जवळजवळ सर्वच अवयव भाग घेतात. म्हणून याला सर्वांगासन म्हणतात .हे आसन करताना प्रथम पाठीवर झोपावे .हात आणि तळवे जमिनीला टेकवावे .आता सावकाशपणे पाय उचलून 90 अंशाचा कोन करावा .अनंतर हातांवर भार देऊन पायांसकट सर्व शरीरावर उचलावे .हनुवटी छातीला लावून हात वाकून निंतंबांना आधार द्यावा .शरीराचा सर्व भार डोक्याच्या मागच्या भागावर ,मानेवर आणि खांघावर तोडून धरावा .धड आणि पायी एका सरळ रेषात असायला हवीत. नजर पायाच्या अंगठ्यावर लावावी. अशा स्थितीमध्ये तीन-चार मिनिट राहावे. नंतर सावकाश पाय खाली करून पूर्वी स्थितीत यावे. सर्वांगासनामुळे थायरॉराइड आणि पॅरा-थायरॉराइड ग्रंथींना आणि मेंदूला चालना मिळते. आणि मानसिक बळ प्राप्त होतो.
५)हलासन Halasan
ह्या आसनामान्य प्रथम हात आणि पाय सरळ ठेवून पाठीवर झोपावे. हळूहळू हात वर उचलावे. 30°, 60°, 90°, असे कोन करावेत. प्रत्येक कोन करताना क्षणभर थांबावे. मग गुडघ्यामध्ये न वाकता पाय कपाळावरून मागे न्यावेत. डोक्याच्या मागे पायांची बोटे जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. पाय जास्तीत जास्त ताणून धरावेत. हात मात्र जमिनीवर सरळ ठेवावे .या अवस्थेमध्ये दहा सेकंद ते तीस मिनिट रहावे. नंतर पाय उचलून पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यावे .या आसनामुळे पाठ, मान आणि पाय यांच्यावरचा ताण मोकळा होतो.
६) भुजंगासन Bhujangasana
यात प्रथम पाय आणि हात सरळ ठेवून पोटावर झोपावे. पायाचे तळवे वरच्या दिशेला करावे .कपाळ आणि नाग जमिनीला लावावे. आता दोन्ही हातांचे तळवे दोन्ही खांद्यांच्या जवळ ठेवावे. आणि दोन्ही हातांचे कोपर छातीजवळ ठेवावे. दिर्ध घ्यावा आणि सावकाशपणे बेंबीपासून डोके,मान ,खांदे ,छाती आणि पोट यावर उचलावे डोके मागे नेऊन पाठीची कमान करावी श्वास रोखुन क्षणभर या अवस्थेमध्ये राहावे .मग सावकाशपणे डोके खाली करावे. या आसनामुळे पोटांचे स्नायू आणि गर्भाशय अंडकोश यांना बळ प्राप्त होतो. पाठीचा कणा आणि स्नायू लवचिक होतात.
७)शलभासन Shalabhasana
हात आणि पाय सरळ ठेवून पोटावर झोपावे, हनवटी आणि नाक जमिनीला लावावी. नजर समोर ठेवून. हात सरळ ठेवून अंगाखाली घ्यावे. मूठी वळवून मांडयांखाली दाबून धराव्या. आता पाय सरळ ठेवून, सावकाश पाय वर उचलून ,जास्तीत जास्त ताणून मागे नेण्याचा प्रयत्न करावा. काही क्षण या अवस्थेमध्ये राहून नंतर सावकाशपणे पाय खाली घ्यावे. असे चार-पाच वेळा करा या आसनामुळे कंबर, छाती, आणि पाठ ,मान यांना बळ मिळते.
८)धनुरासन Dhanurasana
धनुरातन करताना प्रथम पोटावर झोपावे व हनुवटी जमिनीला लावावी .हात आणि पाय सरळ ठेवावे. त्यानंतर पाय गुडघ्यामध्ये वाकून नितंबांजवळ आणावे .दोन्ही हातांनी पायांची घोटे पकडावे. लांब श्वास घ्यावा .मांड्या .छाती आणि डोके एकाच वेळेस वर उचलावे. हात सरळ ठेवावेत .शरीराचा सर्व भार बेंबीवर तोलुन धरावा . पाठीचा कमान करण्यासाठी प्रयत्न करावा. श्वास तोडताना हात आणि पाय सावकाश खाल्ली घ्यावे. धनुरासनामुळे हात ,खांदे, पाय, घोटे, पाठ आणि खांद्याचे स्नायू बळकट होतात .
९)चक्रासन Chakrasana
यात प्रथम सरळ राहावे .मग हातांच्या तळव्यांनी मांड्यांना स्पर्श करून घ्यावा. तळहात वर करून हात उचलावा आणि कानाजवळ ताठ ठेवावा .त्यास परिस्थितीमध्ये हात खाली असलेल्या बाजूला कंबरेमध्ये वाकावे .खाली असलेला हात मांडीला चिकटकवून गुडघ्यापासून खाली नेऊन घोट्यांवर ठेवावा .दोन्ही हात गुडघ्यांमध्ये न वागतात सरळ राहून द्यावेत. वरचा हात सुद्धा ताठ असून द्यावा ह्या अवस्थेमध्ये काही क्षण राहावे .मग सावकाशपणे सरळ व्हावे. अशी क्रिया दुसऱ्या बाजूनी करावी. या आसनामुळे पोटाच्या बाहेरच्या बाजूंचे स्नायू बळकट होतात. तसेच गुडघे ,हात, खांदे आणि फुफुचे सक्षम होतात.
१०) त्रिकोणीणासन trikoninasana
त्रिकोणासन करताना प्रथम सरळ रहावे. पायांमध्ये अंतर ठेवावे .दोन्ही हात वरून खांघाशी समांतर धरावे .कंबरेतून समोर वाकावे आणि कंबर डावीकडे वळवावी. आता वर बघावे .डावा हात वर उचलून 90 अंशाचा कोन करावा. उजवा हात डाव्या पायाच्या पावलावर ठेवावा .डावा पाय गुडघ्यात न वागतात सरळ ठेवावा .अशा अवस्थेमध्ये काही क्षण राहावे. मग सावकाशीने सरळ व्हावे अशीच क्रिया दुसऱ्या बाजूनी करावी .त्रिकोणासणामुळे सर्व शरीराला व्यायाम घडतो. यामुळे पाठीचा कणा लवचिक होतो. कमरेची चरबी कमी होते. शिवाय ॲडिनल ग्रंथी आणि ओटीपोटातील अवयव सक्षम होतात.
🧘♀️ Yoga Regularly केल्याचे फायदे (Overall Benefits of Yoga for Youthfulness)
- त्वचेवर नैसर्गिक निखार
- मन शांत आणि तणावमुक्त
- वजन नियंत्रणात
- शरीर सडपातळ आणि लवचिक
- रक्ताभिसरण सुधारते
- झोपेची गुणवत्ता वाढते
📌 तरुणपण टिकवण्यासाठी टिप्स (Bonus Tips to Stay Young Naturally)
- दररोज सकाळी किमान 30 मिनिटे योग करा
- भरपूर पाणी प्या – Skin hydration is key
- Processed food टाळा आणि फळे-भाज्यांचा आहार वाढवा
- आठवड्यातून एकदा face yoga किंवा facial massage करा
- वेळेवर झोपा – sound sleep is essential for glowing skin
❓ FAQs – तरुण दिसण्यासाठी योगासने बाबत नेहमीचे प्रश्न
Q1: तरुण राहण्यासाठी कोणते योगासन सर्वोत्तम आहे?
A1: सर्वांगासन आणि चक्रासन हे दोन्ही योगासनं चेहऱ्याला आणि त्वचेला निखार देतात, त्यामुळे ते श्रेष्ठ मानले जातात.
Q2: योगामुळे खरंच त्वचा तरुण राहते का?
A2: होय, योगामुळे रक्ताभिसरण वाढते, स्ट्रेस कमी होतो आणि हॉर्मोन्स बॅलन्स होतात – हे सर्व गोष्टी त्वचेला तरुण ठेवतात.
Q3: कोणती वेळ योगासाठी योग्य आहे?
A3: सकाळी सूर्योदयाच्या वेळी योगासने केल्यास शरीराला आणि मनाला सर्वाधिक फायदा होतो.
Q4: योगासने करताना काय खाणे योग्य आहे?
A4: हलका आहार, जास्त फळभाज्या, सूप, आणि भरपूर पाणी सेवन करावे.
🔚 निष्कर्ष (Conclusion)
तरुण आणि उत्साही राहण्यासाठी योगासने ही एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. शरीराला आकार देण्यापासून ते मन शांत करण्यापर्यंत योग आपल्याला संपूर्ण आरोग्य देतो. दररोज केवळ 30 मिनिटे योगासन केल्यास तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसू शकता.
“Stay youthful not just in body, but also in mind – with the power of Yoga!”
मानवी पाच इंद्रिये:आणि त्यांची कार्ये
कॅन्सर निदान: तज्ञांचा सल्ला व उपचार मार्गदर्शिका
निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार | Types of Yoga For Health In Marathi
1 thought on “तरुण दिसण्यासाठी 10 योगासने करावी.”