१० पोषक फळे आणि त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे

१० पोषक फळे आणि त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे 10 Nutritious Fruits and Their Important Health Benefits

आंबा (Mango)

 1️⃣आंबा (Mango)

पोषणमूल्ये :-

▪️आंब्याच्या रसात A व C जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते . तसेच कॅल्शियम, फॉस्फरस व लोह सुद्धा असते .

आरोग्यासाठी उपयोग :-

१) वजन कमी झाल्यावर आंबा खाल्ल्यात वजन वाढते .

२) हृदयातील स्नायूंना बळकट निर्माण करतो,व पचनशक्ती वाढते ,

३) डोळेच्या तक्रारी,त्वचारोग,आतड्यांच्या तक्रारी रक्तातील दोष इत्यादींमध्ये उपयुक्त आहे .

४) आंब्याचे अधिक सेवन शरीराला उषाता निर्माण करते. आंबा खाल्यावर मनही तृप्त होते .

५) मधाबरोबर आंबा खाल्याने कफ दूर होतो .

 सफरचंद (Apple)

2️⃣ सफरचंद (Apple)

पोषणमूल्ये :-

▪️सफरचंदामध्ये ग्लुकोज, फॉस्फरस, कार्बोहायड्रेड पोटॅशियम लोह ,खनिज मोठ्या प्रमाणात आढळते .

▪️सफरचंदाच्या सालीमध्ये म्हणजे C विटामिन असतात .

आरोग्यासाठी उपयोग :-

१) रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा .

२) चरबी वाढलेल्या लोकांनी झोप न येणाऱ्या लोकांनी सफरचंद खाल्ल्यास निश्चित फायदा होतो .

३) रक्तक्षय, अतिसार ,पचनसंस्थेतील बिघाड ,हृदयरोग, उच्च रक्तदाब, मुतखडा, डोळ्यांच्या तक्रारी ,उत्साह वाढण्यासाठी ,झोप येण्यासाठी सफरचंद हे उपयुक्त आहे .

४) सफरचंद वायु व पित्तनाशक, पौष्टिक, कपनाशक ,थंड, रुचकर वीर्यवर्धक, कामउत्तेजक हृदयासाठी हितावह ,रक्त शुद्ध करणारे असतात .

१० पोषक फळे आणि त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे

3️⃣ संत्री (Oranges)

पोषणमूल्ये :-

▪️संत्र्यांमध्ये अ ,ब ,क आणि ड जीवनसत्त्व आढळतात.

तसेच खनिज क्षार सुद्धा असतात .

आरोग्यासाठी उपयोग :- 

१) लोह आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात वाढते .

२) संधिवातामध्ये संत्रे रामबाण समजले जाते.सांधे दुखणे हातपायांना कळा यावर संत्रे उपयुक्त ठरतात .

३) संत्र्यांचा आहार वापर केल्याने पोटातील कृती नाहीशा होतात .तसेच दात , हिरड्या हाडे मजबूत होतात .

४)‌ खराब झालेल्या जठराची आतड्यांच्या शुद्धी करण्यासाठी संत्रे उपयुक्त ठरतात .

५) तसेच बेचैनी दूर करण्यासाठी तसेच मेंदू शांत ठेवण्यासाठी संत्री वापरले जाते .

१० पोषक फळे आणि त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे

4️⃣ जांभूळ (Purple)

पोषणमूल्ये :-

▪️जांभळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस ,लोह ,क जीवनसत्व ,ब जीवनसत्व आणि कॅलरीज असतात .

आरोग्यासाठी उपयोग :-  

१)जांभळे खाल्याने रक्त शुद्ध आणि लाल बनते त्यामुळे कावीळ,पंडुरोग बरे होऊन शरीर लाल बनते.

२)जांभुळ हे पचण्यास जड आणि रुची उत्पन्न असते . मधुर आणि जुलाब गुणकारीक असते .

३)जांभळाच्या सालीच्या औषधे असते. पोट फुगणे ,करपट ढेकर येणे ,पोटात गोळा येणे यावर जांभूळ रस गुणकारी ठरतो .

४) जांभळापासून लघवी शुद्ध केली जाते जांभूळ आणि त्यांच्या बिया पाचक आणि स्तंभक असतात .

पेरू (Guava)

5️⃣ पेरू (Guava)

पोषणमूल्ये :-

▪️पेरूमध्ये C जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात. कॅल्शियम, ग्लुकोज, फॉस्फरस , टॅनिन ॲक्झीलेट इत्यादी प्रमाणात आढळते .

आरोग्यासाठी उपयोग :-

१) दुपारी जेवणात पेरू खाणे अत्यंत फायदेशीर असते .

२) पेरू तुरट, गोड, कधी खारट, वीर्यवर्धक ,कपकारक ,वात आणि पित्तशामक असतो . रक्तदाब, रक्तविकार , गरोदरपणात होणाऱ्या उलट्या दूर होतात .

३) पेरूच्या पानांमध्ये सुद्धा डोळ्यांची सूज वेदना इत्यादींमध्ये पेरू उपयोगी असतो .

6️⃣फणस (Fanas)

पोषणमूल्ये :-

▪️फणसामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह , कॅरोटीन,थायमिन, नायसिन, क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते .

▪️तसेच फणसाच्या बियांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि जादा कॅलरीज असतात.

आरोग्यासाठी उपयोग :-

१) मध आणि गुळ घालून फणस खाल्ल्यात शक्तिवर्धक आणि पौष्टिक असते .

२) मध आणि खोबरं घालून खाल्ल्यास फणस बाधत होत नाही .

३) फणसाची मुळे आणि कोवळी पाने उकळून केलेला काढा सर्पदंश ,अमांश, अतिसार, यावर उपयोगी पडतो .

डाळिंब (Pomegranate)

7️⃣ डाळिंब (Pomegranate)

पोषणमूल्ये :-

▪️व्हिटॅमिन स, व्हिटॅमिन क,फोलेट ,पोटॅशियम. ,कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी घटक असतात .

आरोग्यासाठी उपयोग :-

१) डाळिंब पित्तनाशक, स्तंभक ,कृत्रिमनाशक असते ‌.

२) त्रिदोषनाशक तृष्णा, दाह आणि तापात फायदेशीर असते .

३) पित्त प्रकृतीच्या लोकांनी नेहमी डाळिंब खावे .

४) डाळिंबीच्या दाण्यांचा रस डोळ्यांतील अतिरिक उष्णता कमी करते .

५) पित्तप्रकोप अरूची, खोकला, डोळ्यांची जळजळ, छातील आग होणे ,बेचैनी वाटणे, इत्यादी तक्रारी वर डाळिंब फायदेशीर असते .

सिताफळ (Sitaphal)

8️⃣ सिताफळ (Sitaphal)

पोषणमूल्ये :-

▪️कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ,थायमिन, नायसिन, क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते .

आरोग्यासाठी उपयोग :-

१) हीस्टेरीया, त्वचारोग, जुलाब,क्षय, अल्सर इत्यादी सीताफळाचा चांगला उपयोग होतो .

२) सिताफळ वातूळ ,पित्तशामक, कपकारक, उलटी बंद करणारे असते ,

३) दीर्घ आजारानंतर येणाऱ्या थकव्याला सीताफळ खाल्याने चांगला फायदा होतो .

४) सिताफळाच्या बिया उपयोग डोक्यातील उवा घालवण्यासाठी होतो .

अंजीर (Flg)

9️⃣ अंजीर (Flg)

पोषणमूल्ये :-

▪️कॅल्शियम, फॉस्फरस ,लोह,अ जीवनसत्व, क जीवनसत्व, ब जीवनसत्व असलेले फळ आहे .

आरोग्यासाठी उपयोग :-

१) मलावविरोध, मुळव्याध ,दमा, हुरूप लैंगिक दुर्बलता इत्यादी आजारांसाठी उपयुक्त ठरते.

२) अंजीर हे पौष्टिक रक्तवर्धक व पित्तशामक असते अंजीर दुधात उकळून व त्यावर उकळलेले दूध प्यावे त्याने अंगात शक्ती येथे व रक्त वाढते . व शरीरातील उष्णता कमी होते .

३) श्वासाचा आजार असल्याने रोज सकाळी सुके अंजीर खावे .

४) अंजीर जास्त खाल्ल्याने पोट दुखू शकते व पचनशक्ती कमकुवत होऊ शकते .

लिंबू (Lemon)

🔟 लिंबू (Lemon)

पोषणमूल्ये :-

▪️सायट्रिक ॲसिड, कॅल्शियम ,फॉस्फरस,क जीवनसत्व लिंबामध्ये मुबलक प्रमाण आहेत .

आरोग्यासाठी उपयोग :-

१)सकाळी लिंबू पाणी पिल्याने शरीरातील चरबी कमी होते .

२)जेवणात लिंबू खाल्याने पचन चांगले होते .

३)चेहऱ्यावरील लिंबू रस लावल्याने चेहरा तरुण व सुंदर दिसतो .

४)लिंबामध्ये किंचित प्रमाणात बी कॉम्प्लेक्सपण असते. पचनसंस्थेच्या तक्रारी,अल्सर,बद्धकोष्ठता,डोळेच्या तक्रारी, रक्तमूळव्याध ,स्थुलता, सौंदर्य साधन इत्यादी उपयोगी होतो .

मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशनचे महत्त्व

Health : ही 10 फळे शरीरासाठी आहेत सर्वात जास्त आरोग्यदायी, एक कायम असतं सर्वांच्या घरात!

नारळ, फणस, काजू आणि बदाम: आरोग्यासाठी फायदे आणि उपयोग

तणावमुक्त राहण्यासाठी १० सोपे उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *